नवी दिल्ली : देशाच्या ७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावणार आहेत. इथूनच ते देशाला सलग सातव्यांदा संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमासाठी जवळपास ४००० पाहुण्यांना दिल्लीत आमंत्रित करण्यात आलंय. (अपडेट पाहण्यासाठी वेबपेज रिफ्रेश करा) Live अपडेट - लाल किल्ल्यावर पंतप्रधानांना 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यात आला. 'गार्ड ऑफ ऑनर'ची कमांड लेफ्टनंट कर्नल गौरव एस. येवलकर यांच्या हाती आहे. - पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठ्या ताफ्यासह लाल किल्ल्यावर दाखल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी पंतप्रधानांचं स्वागत केलं. - प्रथम राजघाटावर पोहचून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली. - लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आणि संरक्षण प्रमुख जनरल बिपिन रावत लाल किल्ल्यावर दाखल -काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही सोशल मीडियावरून देशाला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. - स्वातंत्र्य दिनानिमित्तानं लाल किल्ला परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. - पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावरून देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत असा असेल कार्यक्रम - सकाळी ७.०५ मिनिटांनी पंतप्रधान मोदी राजघाटावर पोहचतील - यानंतर ते थेट लाल किल्ला गाठतील - कार्यक्रमाच्या रुपरेषेनुसार, ७.२८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. - त्यानंतर जवळपास ४५ - ९० मिनिटे पंतप्रधान मोदी देशाला लाल किल्ल्यावरून संबोधित करणार आहेत. संबंधित बातम्या : वाचा : वाचा : वाचा :
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/344cdfI
