कुमारी मनकर्णिका माने हिचा ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस्’ मध्ये नोंद
जयसिंगपूर
(प्रतिनिधी) जयप्रभा इंग्लीश
मिडीयम स्कूल मधील कुमारी मनकर्णिका अभिजीत माने (शिरोळ) इयत्ता चौथीत
शिकत असणारी चिमुरडी विद्यार्थिनीने ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस्’ मध्ये आपले नाव नोंद
करून राष्ट्रीय विक्रम केला.
कुमारी मनकर्णिका
हिने विशेष प्राविण्य
आत्मसात केली आहे चतुरंग (बुध्दीबळ) या खेळा मध्ये डोळ्यावर पट्टी बांधून अगदी सफाईदारपणे समोरच्या व्यक्तीची
चाल ओळखून प्रतिचाल करते. डोळे बंद करून ती कॅरम आणि पत्ते खेळते. डोळे बंद करून चित्र काढते, वर्तमानपत्रे आणि
पुस्तके वाचते, नोटा ओळखते तसेच डोळ्यावर पट्टी बांधून वहीतील कोणत्याही ओळीवर नाव सहज पध्दतीने अचूक ओळीवर लिहते. बुद्धिमत्ता, वाक्चातुर्य आणि
अभिनय व कलागुण असल्यामुळे अनेक राज्यस्तरीय पारितोषिके पटकविले आहे.
लहानपणापासूनच
तिची आकलन क्षमता आणि स्मरणशक्ती खूप चांगली आहे. एकपाठी असल्याने तिने अनेक
राज्यस्तरीय वक्तृत्त्व स्पर्धा गाजवल्या असून तिला अनेक पारितोषिके मिळाली आहेत.
मनकर्णिका हिच्या नावातच एक आत्मविश्वास, जिद्द, धाडस आणि करारीपणा आहे.
तिच्या नावातच एकप्रकारचे वलय आहे. कारण ‘मनकर्णिका’ म्हणजे ‘झाशीची राणी’ तशीच ही मनकर्णिकासुद्धा ही विशिष्ट, दुर्मिळ आणि कोणासही सहज प्राप्त करता येणार नाही अशा
कलेचे-ज्ञानाचे सादरीकरण अतिशय नम्रपणे व चौफेर करते.
कुमारी मनकर्णिका
अभिजीत माने या विद्यार्थिनीच्या विक्रमाची नोंद महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् चे
मुख्य संपादक आणि प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे
दिली. मनकर्णिका अभिजीत माने या विद्यार्थिनीच्या नावावर नोंदवल्या गेलेल्या या
विशेष राष्ट्रीय विक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 