Breaking News

Sunday, 23 August 2020

Star Yuva Marathi News Channel Network

मोबाईल रेंजवर मात करत बहिण-भाऊ गिरवताहेत धडे

कवठेमहांकाळ : एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे शिक्षणाची प्रचंड ओढ या दुहेरी कात्रीत विद्यार्थी सापडला असताना कोरोनाचे संकट थोपवण्यासाठी सर्वत्र ऑनलाईन शिक्षण सुरू झाली. खरशिंग येथे ऑनलाइन शिक्षणाचा लाभ घेण्यासाठी चक्क बहिण भावाने मोबाईलला घरी रेंज येत नसल्यामुळे नजीकच्या रानातील झाडाचा आधार घेत मोबाईलच्या रेंजवर मात करीत ऑनलाइन शिक्षणाचे धडे सुरु ठेवले आहेत. 

जिल्हा परिषद शाळेचे शिक्षण ऑनलाईन शिक्षण देत आहे. सहावीत शिकणारे प्रणव गुरव व प्रणाली गुरव हे बहीण-भाऊ तसेच त्यांचेच छोटे भाऊ रुद्र व निखिल गुरव भावंडांनी शेतातील घरांत रेंज येत नाही म्हटल्यानंतर घरासमोरील एका झाडाखाली ऑनलाइन शिक्षणासाठी बसत होते. पावसाचा त्रास होत असल्याने त्योंनी पालकांची मदत न घेता स्वतःसाठी छोटासा निवारा झाडाखाली तयार केला. ऑनलाइन शिक्षणासाठी ते विद्यार्थी बसू लागले. 

कोव्हिडच्या संकटात शिक्षण मिळण्यासाठी सर्वांची धडपड सुरू सुरू असताना खरशिंगपासून सुमारे दोन किमी अंतरावर असलेल्या वस्तीवरील या विद्यार्थ्यानी एक वेगळाच आदर्श ठेवला आहे. शिक्षणासाठी झाडाचा आधार घेत ऊन. वारा पाऊस याची तमा न बाळगता हे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. 

शाळेने ऑनलाईन शिक्षण सुरू केले. गावापासून काही अंतरावर वस्तीवरील विद्यार्थ्यांनी घरात मोबाईल रेंज येत नसल्याने झाडाचा आधार घेत स्वतः निवारा केला. ऑनलाईन शिक्षण घेत आहेत याचा अभिमान आहे. पाऊस व थंडी असतानाही सहावीतील हे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत असल्याने आदर्श निर्माण केला आहे.'' 

-तारीश अत्तार, जिल्हा परिषद शाळा,खरशिंग. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 



from News Story Feeds https://ift.tt/3aQoiq6

Subscribe to this Blog via Email :
Previous
Next Post »