Breaking News

Saturday, 8 August 2020

Star Yuva Marathi News Channel Network

वाळवा महसूलची विस्कटलेली आर्थिक घडी पूर्वपदावर 

इस्लामपूर : कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात वाळवा महसूल विभागाची विस्कटलेली आर्थिक घडी हळू हळू पूर्वपदावर येत आहे. जुलै 2020 मध्ये 364 दस्तांची शासनाकडे नोंद झाली. यामधून शासनास 1 कोटी 9 लाख 45 हजार रुपयांचा महसूल जमा झालेला आहे. 

कोरोनामुळे महसूल प्रशासना पुढे गेली दोन महिने झालेली आर्थिक तूट भरून काढण्यासाठीचे मोठे आव्हान उभे राहिले होते. 23 मार्च पासून संपूर्ण देशात लॉक डाऊन जाहीर करण्यात आले होते. त्या दिवसापासून 4 मे पर्यंत सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये बंद करण्यात आली होती. त्यामुळे शासनाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली होती.11 मे ला महसूल विभागाची कार्यालय सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले. त्यामुळे महसूल विभागाचे काम पूर्ववत सुरू करण्यात आले. 

परंतु सोशल डिस्टन्स, जिल्हा बंदी या कारणामुळे नागरिक आपले खरेदी विक्री व्यवहार पूर्ण करू शकत नव्हते. जिल्ह्यामध्ये संचार बंदी लागू केल्याने महसूल विभागाचे सर्व व्यवहार थांबले होते. त्याची आर्थिक झळ प्रशासनाबरोबर त्याच्या निगडित छोट्या मोठ्या व्यवसायिकना बसलेली आहे. यामध्ये स्टॅम्प होल्डर यांचा स्टॅंप विक्रीवर उदरनिर्वाह चालतो. खरेदी विक्री व्यवहारच थांबल्यामुळे स्टॅम्प होल्डर यांची दयनीय अवस्था झाली होती. प्रशासकीय इमारतीच्या आसपासचा परिसराचा विकास हा त्याठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या वरदळीवर अवलंबून असतो. झेरॉक्‍स, कॉम्पुटर शॉपी, या सर्वांच्यावर कोरोनामुळे संक्रात आलेली होती.आज रोजी ही स्थिती पूर्व पदावर येण्यास सुरुवात झाली आहे. 

"कोरोना विषाणूचे संक्रमण होऊ नये म्हणून प्रत्येकांनी दक्षता घेऊन जमिनीचे दस्त करण्यास यावे असे प्रशासन नागरिकांना आवाहन केले आहे. अत्यंत महत्त्वाचे असेल तरच स्वतःची, सोबत येणाऱ्या लोकांची काळजीसाठी चेहऱ्यास मास्क लावून, सोशल डिस्टन्स चा वापर करून महसूल कार्यालयात यावे." 
- पं. व. पाटील, सह. दुय्यम निबंधक वर्ग-2. वाळवा (इस्लामपूर) 

सांगली 
संपादन : प्रफुल्ल सुतार



from News Story Feeds https://ift.tt/30I8nqJ

Subscribe to this Blog via Email :
Previous
Next Post »